Great Narsobachi Wadi Temple Bhakta Niwas and top 10 Hotels Booking

।। नमो दत्त नमोदत्त ।। दत्त दत्त नमो नमो।। गुरो दत्त गुरोदत्त ।। दत्त दत्त नमो नमो।। आपले सर्वांचे स्वागत आहे भक्तनिवास या वेबसाइट मध्ये मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र Narsobachi Wadi Temple आणि Narsobachi Wadi Bhakta Niwas बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्याच सोबत जर आपण narsoba wadi ला भेट देण्याचा बेत करत असाल तर नरसोबाच्या वाडीला राहण्यासाठी Narasobachi Wadi bhkata niwas आणि तेथील टॉप 10 हॉटेल्सची माहिती घेणार आहोत.

Table of Contents

About Narsobachi Wadi

नृसिंहवाडी (Nrusinhawadi) ला Narsobawadi आणि Narsobachi Wadi Temple अश्या नावाने देखील ओडखतात. नरसोबाची वाडी हे श्री दत्त भक्तांची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. नरसोबावाडी हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध व जागृत तीर्थक्षेत्र आहे. महाराष्ट्रतील प्रमुख नद्या कृष्णा आणि पंचगंगा यांच्या पवित्र संगमावर Narsoba Wadi हे स्थळ वसलेले असून कोल्हापूर पासून ४५ किमी अंतरावर आहे.

Name of PlaceNarsobachiwadi / Narsoba Wadi
TalukaShirod
DistrictKolhapur
STD Code02322
Pincode of Narsobachi Wadi416104

Address of Narsobachi wadi Temple

श्री नरसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान,
नरसोबावाडी (पो), ता. शिरोळ,
जि. कोल्हापूर.पिन ४१६१०४
महाराष्ट्र राज्य

Narsobachi wadi Temple

Contact Numbers of Narsobachi Wadi Temple

आपण जर नरसोबाच्या वाडीला भेट देण्याचां बेत आखला असेल आणि आपण जर मंदिर प्रशासनाचा Contact number शोधत असाल तर Narsobachi Wadi Temple Contact Number हा आहे. 02322-270006 / 270064

History of Narsobachi Wadi Temple

श्री नृसिंह सरस्वती स्वामी देव दत्ताचे मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यातील नरसिंहवाडी येथे आहे. नृसिंह सरस्वती औदुंबर येथील चातुर्मास संपवून प्रवास करीत असताना येथे भेट दिली होती पंचगंगा नदीच्या पलीकडे अमरेस्वराचे मंदिर असल्यामुळे या ठिकाणाला अमरापुर असे म्हंटले जायचे. श्री नृसिंह सरस्वती यांना हे ठिकाण इतके आवडले की ते ठिकाणी १२ वर्षे राहिले. पुढे चालून या ठिकाणाला श्री नरसिंह सरस्वती यांच्या नावावरून नरसोबाची वाडी (Narsobachi wadi) किंवा नरसोबावाडी (Narsobawadi) असे नाव पडले.

गुरूचरित्र अध्याय १९ मध्ये अशी नोंद आहे की;

“मी माझ्या पादुका इथे सोडत आहे. जिथे माझ्या पादुकांची पूजा केली जाते तिथे मी नेहमी उपस्थित राहीन. पादुकांचे पूजन करून ज्या काही प्रार्थना करायच्या आहेत, त्या पूर्ण केल्या जातील. – श्री नृसिंह सरस्वती.

तेंव्हापासून पूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातून सर्व श्री दत्तात्रयांचे भाविक श्री नरसिंह सरस्वती यांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी नरसोबाच्या वाडीला अवश्य भेट देत असतात.

Who is Shri Nrusinha saraswati

श्री नृसिंह सरस्वती किंवा नरहरी सरस्वती हे दत्तात्रेयांचे दुसरे पूर्णाअवतार म्हणून मानले जातात. नरसोबाची वाडी गाणगापूर आणि औदुंबर येथे त्यांच्या पादुका आसून दरवर्षी लाखो भाविक त्यांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. चला जाणून घेऊ Shri Nrusinh saraswati बद्दल.

नावंश्री नृसिंह सरस्वती किंवा नरहरी सरस्वती
मूळ नावशालग्राम देवमाधव काळे
कार्यकाळइ.स. १३७८-१४५९
जन्मस्थळवाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड गाव.
आई वडिलांचे नावआई:- अंबाभवानी/ वडील :- देवमाधव
वेषसंन्याशी
गुरूकृष्ण सरस्वती
तिर्थाटनइ. स. १३८८ ते १४२१
औदुंबर चातुर्मासइ. स. १४२१
नरसोबावाडीइ. स. १४२२ ते  १४३४
गाणगापुरइ. स. १४३५ ते  १४५८   
Who is Shri Nrusinha saraswati

Natural Beauty of Narsobachi Wadi Temple

नरसोबाची वाडी हे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील आहे. पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावर हे Narsoba Wadi हे गाव असल्यामुळें निसर्गाने या गावाला भरभरून दिले आहे. नृसिंहवाडी परिसर कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांच्या मध्यभागी सुमारे एक चौरस मैल पसरलेला आहे. शहराची लोकसंख्या सुमारे 4000 आहे. कृष्णा नदीच्या घाटावर आणि मोठ्या औदुंबर वृक्षांच्या खाली एक सुंदर आणि आकर्षक मंदिर आहे.

नरसोबाची वाडी येथे वट वृक्षांचे घनदाट जंगल आहे. त्यामुळे Shri Nrushinha Saraswati यांना हे ठिकाण आवडले होते व त्यांनी नरसोबा वाडीचे नैसर्गिक सौंदर्य पाहूनच येथे १२ वर्ष राहिले. जर आपण श्री स्वामी समर्थ यांचे भक्त असाल तर आपण आमच्या या वेबसाईटवर वरील अक्कलकोट भक्त निवास बुकींग ही पोस्ट वाचा तुम्हाला अक्कोलकोट मध्ये राहण्याची व्यवस्थेबद्दल माहिती मिळेल.

What is Famous In Narsobachi Wadi Temple ?

नरसोबाची वाडी मध्ये नृसिंह सरस्वती यांचे मंदिर प्रसिद्ध आहे. Narsoba Wadi ला श्री दत्त भक्तांची राजधानी म्हणतात. त्यामुळे तेथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात.

Narsoba Wadi मध्ये फक्त श्री नरसिंह सरस्वती यांचे मंदीर सोबतच येथील काही पदार्थ सुद्धा प्रसिद्ध आहेत ते आपण बघू.

 • कवठ बर्फी, (Desert made from Limonia)
 • बासुंदी
 • कंदी पेढे
 • खोबऱ्याच्या वड्या
 • कुरडई वड्या

वरील सर्व पदार्थ नर्सोबा वाडीला प्रसिद्ध आहे, Narsoba wadi मध्ये जर तुम्ही जर आले तर नक्की वर दिलेल्या पदार्थांची एकदा चव घेण्याचे विसरू नका. खासकरून नरसोबाच्या वाडीमध्ये सीताफळ बासुंदी (Custurd Apple Basundi) खायला विसरु नका.

These rituals can be performed in Nrisimha wadi (Narsobachi Wadi Temple)

Narsobachi Wadi हे श्री दत्त भक्तांची राजधानी असून नरसोबाच्या वाडीला खालील विधी करण्यासाठी भाविक येत असतात. नरसोबाच्या वाडीत खालील विधीसुद्धा केल्या जातात.

अनुक्रमांकविधी
नारायण नाग बळी
त्रिपिंडी श्राद्ध
नवग्रह नक्षत्र शांती
महारूद्राभिषेक
महा अभिषेक
गुरू चरीत्र पारायण
काल सर्प दोष शांती,
गणेश याग
श्री दत्त याग
These rituals can be performed in Nrisimha wadi

Narsobachi Wadi Temple Daily Routine

वेळदिनचर्या
सकाळी 05.00 वाजताकाकड आरती व पादुका पूजा
सकाळी 08.00 ते 12.00 वाजतारुद्र अभिषेक
दुपारी 12.30 ते 01.30 वाजेपर्यंतमहापूजा व आरती
संध्याकाळी 07.30 वाजताधूप आरती
रात्री 08.00 वाजतापालखी
रात्री 10.00 वाजताशेज आरती
(शेज आरती नंतर मंदिर भाविकांसाठी बंद होते)

Narsobachi Wadi Temple Major Festival

जर आपण नरसोबाच्या वाडीचे दर्शन घेण्यासाठी जात असणार तर खाली दिलेल्या प्रमुख उत्सवात नरसोबाच्या वाडीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातुन भाविक येतात.

अनु क्र मुख्य उत्सव दिन
दत्त जयंती
नरसिंह जयंती
गोकुळ अष्टमी
श्रीपाद श्रीवल्लभ जयंती

How to Reach Narsobachi Wadi Temple

मित्रांनो श्री दत्तात्रेयंचे भक्त पूर्ण भारत देशात पसरलेले आहेत त्यामुळे श्री नृसिंह सरस्वती यांच्या ज्याठिकाणी पादुका आहेत असे Narsobachiwadi येथे लाखो भाविक त्या पादुकांचे दर्शन करण्यासाठी येत असतात. नरसोबाची वाडी हे गाव महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात आहे.

या ठिकाणी मुंबई, पुणे, कोल्हापूर, मिरज, सांगली, जयसिंगपूर, निपाणी आणि हुबळी येथून MSRTC बसने जाता येते. मी तुम्हाला मुंबई, पुणे कोल्हापूर निपाणी आणि हुबळी येथून सुटण्याच्या वेळा तपासण्याची विनंती करतो परंतु तुम्हाला मिरज, सांगली आणि जयसिंगपूर येथून नियमित MSRTC बसेस मिळतील. चला तर बघुया नरसोबाची वाडी येथे आपणं रोड, रेल्वे आणि हवाई मार्गाने जाण्यासाठी कुठकुठल्या सुविधा उपलब्ध आहेत.

Narsobachi Wadi Temple Google Map

How to reach Narsobawadi Mandir by Road

नरसोबाच्या वाडीला सर्वात जवळचे मोठे शहर कोल्हापूर हे आहे. आपण कोल्हापूर वरून नरसोबाच्या वाडीला रोड मार्गाने जावू शकतो. चला बघुया कोल्हापूर वरून आपण नरसोबाच्या वाडीला जाण्यासाठी कुठ कुठल्या सुविधा उपलब्ध आहेत.

Kolhapur to Narsobachi Wadi Temple Distance

कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर आहे कोल्हापूर मधील महालक्ष्मी मंदिर हे एक प्रसिध्द देवस्थान असून भविक श्री महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेतल्यावर जवळच असलेल्या Narsobachi Wadi या देवस्थानाला अवश्य भेट देतात. kolhapur mahalaxmi temple to narsobachi wadi distance हे 84 किमी आहे. नरसोबाची वाडी हे ठिकाण कोल्हापूर मधील एक देवस्थान असून या ठिकाणी देशभरातून लाखो भाविक श्री नृसिंह सरस्वती यांच्या पादुकांचे दर्शन करण्यासाठी येत असतात. कोल्हापूर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे कोल्हापूर वरून Narsobachi Wadi ला जाण्यासाठी MSRTC Buses सोबतच Luxury Buses, Private Cars सुद्धा उपलब्ध आहेत. Kolhapur to Narsobachi wadi Distance 50 KM आहे.

Bording Points in Kolhapur

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे संचालित कोल्हापूर ते कुरुंदवाड येथे वारंवार बस फेऱ्या होतात. प्रवासाला सुमारे 1 तास 15 मिनिटे लागतात. तुम्ही तुमची बस तिकिटे MSRTC वेबसाइट वरून ऑनलाइन सुद्धा बुक करू शकता.

 • Kawala Naka
 • Kolhapur Bus Stand
 • Royal Plaza

Dropping Point in Narsobachi Wadi Bus Stand

 • Narsobawadi

Kolhapur to Narsobachi Wadi Bus Time Table

Kolhapur to Narsobachi wadi Departure
Time
Arrivals TimeFare
Ordinary06:00 AM07:15 AM₹105
Semi Luxury08:00 AM09:15 AM₹115
AC Deluxe10:00 AM11:15 AM₹130
Ordinary12:00 PM01:15 PM₹105
Semi Luxury02:00 PM03:15 PM₹115
AC Deluxe04:00 PM05:15 PM₹130
Ordinary06:00 PM07:15 PM₹105
Semi Luxury08:00 PM09:15 PM₹115
AC Deluxe10:00 PM11:15 PM₹130
Kolhapur to Kurundwad (Narsoba Wadi) Bus Time Table

Distance from Major Cities to Narsoba Wadi Temple

FromToKilometer
KolhapurNarsoba Wadi50 KM
PuneNarsoba Wadi250 KM
SangliNarsoba Wadi21 KM
BelagaviNarsoba Wadi105 KM
NagpurNarsoba Wadi899 KM

Some other Routs to Narsobachi wadi.

Kolhapur – Ichalkaranji – Kurundwad – Narsobawadi,
Kolhapur – Jaysingpur – Shirol – Narsobawadi,
Miraj – Shirol – Narsobawadi,
Nipani – Borgaon – Herwad – Kurundwad – Narsobawadi,
Belgaum – Nipani – Chikodi- Raibag- Jalalpur-Borgaon – Herwad – Kurundwad – Narsobawadi.

How to reach Narsobachi wadi Temple by Train

या ठिकाणी कोल्हापूर, पुणे, मुंबई येथूनही रेल्वेने जाता येते. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन जयसिंगपूर आहे आणि ते फक्त 12 किलोमीटर अंतरावर आहे. येथे फक्त प्रवासी गाड्या थांबतात आणि त्यामुळे उतरण्यासाठी पुढील सर्वोत्तम ठिकाण मिरज किंवा सांगली आहे. दिवसभरात 10-12 ट्रेन्स इथे थांबतात आणि तुम्हाला तुमच्या गरजेनुसार ट्रेन मिळेल.

नरसोबाची वाडी या गावाला रेल्वे सुविधा नसल्यामुळे आपल्याला कोल्हापूर या जिल्ह्याच्या ठिकाणी रेल्वेने यावे लागेल व कोल्हापूर वरून MSRTC च्यां बसेस सेवा, कार, जीप आणि लक्झरी बसेस ने नरसोबाच्या वाडीला पोहचता येईल. खालील तक्त्यात महाराष्ट्रातील प्रमुख शहरातून कोल्हापूरला येण्यासाठी Daily Train चे वेळापत्रक दिले आहे.

Mumbai to Kolhapur Daily Trains

Train NoFare
Slipper
Departure TimeArrivals Time
17411 – MAHALAXMI EXP₹31008:35 PM07:15 AM
11029 – KOYNA EXPRESS₹18008:52 AM08:05 PM
17318 – DR HUBBALLI EXP₹27508:15 PM04:52 AM
10103 – MANDOVI EXPRESS₹27507.10 AM04.56 PM
Mumbai to Kolhapur Daily Trains

How to Reach Narsobachi Wadi Temple by Air

कोल्हापूर विमानतळ छत्रपती राजाराम महाराज विमानतळ म्हणूनही ओळखले जाते, हे कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत शहराला सेवा देणारे देशांतर्गत विमानतळ आहे. हे शहरापासून आग्नेयेस 9 किमी (5.6 मैल) अंतरावर उजळाईवाडी येथे वसलेले आहे. हे भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) द्वारे चालवले जाते. कोल्हापुर विमानतळ हे मोठ्या शहरांपासून कोल्हापूरला जोडलेली उड्डाणे उपलब्ध आहेत. कोल्हापूरहून बस, ऑटो किंवा प्रायव्हेट कार ने नरसोबावाडीला जाता येते.

Narsobachi Wadi Bhakta Niwas Maheshwari Dharamashala

श्री दत्तात्रेयांचे अनुयायी मोठ्या संख्येने नरसोबाच्या वाडीला दरवर्षी लाखोंच्या संख्येने येत असतात. त्या भाविकांची राहण्याच्या सोय व्हावी यासाठी Maheshwari Bhakta Niwas उभारण्यात आला असून या ठिकाणी भोजनालय सुद्धा आहे. भाविकांना अत्यंत कमी दरात चांगली राहण्याची जागा व जेवणाची सुविधा येथे पुरवली जाते. जर आपण श्री गजानन महाराज देवस्थान शेगावला दर्शनासाठी जाण्याचा विचार करत असाल तर तेथे सुद्धा संस्थानचे श्री गजानन महाराज मंदिर भक्त निवास उपलब्ध आहेत.

Maheshwari Bhakta Niwas Dharamshala Narsinhwadi (Kolhapur)

नरसोबाची वाडी बसस्थानकापासून 0.5 किमी अंतरावर असलेल्या श्री माहेश्वरी भक्त निवासमध्ये दोन बेडच्या डिलक्स खोल्या आहेत. भोजनालयात जेवण दिले जाते. वाहनांसाठी पार्किंगची जागा उपलब्ध आहे.

Facility in Maheshwari Bhakta Niwas
Address :- Narsobawadi Road, Narasoba Wadi, Maharashtra 416104
Check in & Check Out : 12 PM
Food Facility : Yes
Drinking Water
Parking : Yes
Maheshwari Bhakta Niwas Dharamshala Narsinhwadi (Kolhapur)

Maheshwari Bhakta Niwas (Narsobachi Wadi) Room Rent

नरसोबाच्या वाडीला जर आपण दर्शनासाठी जात असाल तर आपल्याला राहण्यासाठी Maheshwari Bhakta Niwas हे भाविकांना उत्तम राहण्याची व भोजनाची व्यवस्था करते. Maheshwari Bhakta Niwas Room Rent बद्दल खाली माहीती दिली आहे.

Room DetailsRentInclusions
2 Bed Non Ac RoomRs.400/-Double Bed,
2 Mattress
2 Bed Non Ac Room With T.VRs.500/-Double Bed
2 Mattress
2 Bed Deluxe Non AC RoomRs.700/-Double Bed
Wardrobe
Attached Toilet
Geyser
T.V
Maheshwari Bhakta Niwas Room Rent

Maheshwari Bhakta Niwas Terms and Condition

 • महेश्वरी भक्त निवासाचा मुख्य दरवाजा हा रात्री १०.०० वाजे पासून सकाळी ०५.०० वाजे पर्यंत बंद राहील. या दरम्यान कुणालाही भक्त निवासात येण्याची किंवा बाहेर जाण्याची परवानगी नाही.
 • भक्त निवासात प्रवेश करते वेळी भाविकांना अमानत रक्कम जमा करणे बंधनकारक असेल. रूम खाली करतांना सदर अमानत ठेव ही परत करण्यात येईल.
 • निर्धारित व्यक्तीपेक्षा अतिरीक्त प्रती व्यक्ती रू. १०० आकारण्यात येतील.
 • सरकारी नियमांनुसार चेक-इनच्या वेळी सर्व पाहुण्यांनी वैध फोटो ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
 • 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीने वैध फोटो आयडी बाळगणे आवश्यक आहे.
 • अविवाहित जोडप्यांना सक्तीने परवानगी नाही. त्याच शहरात राहणाऱ्या पाहुण्यांना परवानगी नाही.
 • जर बुकिंग भक्त निवासाच्या नियमांचे उल्लंघन करत असेल तर भक्त निवास व्यवस्थापनाला प्रवेश नाकारण्याचा अधिकार आहे. अशा परिस्थितीत त्यांनी चेक-इन नाकारल्यास कोणताही परतावा लागू होणार नाही.
 • कृपया लक्षात घ्या की जवळजवळ सर्व खोल्या/हॉल/खोल्यांसाठी विशिष्ट क्षमता असते ही मर्यादा काटेकोरपणे पाळली जाते.

Maheshwari Bhakta Niwas Bhojanshala Timing

महेश्वरी भक्त निवास धर्मशाळा मध्ये भाविकांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. जर आपल्याला भक्त निवासात भोजन करावयाचे असेल तर आपल्याला आधी कळवावे लागेल.

 • दुपारचे जेवण वेळ 12.00 to 02.00 PM किंमत ₹ 80/- प्रती व्यक्ति.
 • रात्रिचे जेवन वेळ 7.30 to 9.30 PM किंमत ₹ 80/- प्रती व्यक्ती.

Narsobachi Wadi Temple Hotels

नरसोबाच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी Narsobachi Wadi Hotels सुद्धा उपलब्ध आहेत. जर आपल्याला काही कारणामुळे महेश्वरी भक्त निवासात राहण्याची सोय होऊ शकली नाही तर आप Narsobachi Wadi Hotels सुद्धा बुक करून वास्तव्यास राहू शकतो.

Top 10 Hotels in Narsobachi Wadi As per Google Reviews

Name of HotelAmenitiesContact No.
Hotel
Manglam
Parking
Breakfast
Free WiFi
AC
9730974040
Jyoti Yatri
Niwas
AC
Parking
Airport shuttle
Pet-friendly
9403136559
Shivlila Yatri
Niwas
7249642494
Soman Yatri
Niwas
Wifi
Full Service Laundry
Kitchen
Child Friendly
9730505588
Hotel Sai
Delux
Parking
Breakfast
Free WiFi
AC
9823380950
Hotel Great
Maratha
Parking
Breakfast
WiFi
AC
9697460006
Gurudatta HotelParking
Breakfast
WiFi
AC
6262916464
Hotel Ratan
Deluxe
Pool
Breakfast
free Wi-Fi
free Air conditioning
9890252574
Hotel SonaliWi-Fi
free Parking
0230 244 1117
Hotel Grand Fortune BeaconPool
Spa
Breakfast free
Wi-Fi free
0230 242 4950
Top 10 Hotels in Narsobachi Wadi As per Google Reviews

Mahaprasad at Narsobachi Wadi Temple

नरसोबाची वाडी येथे महाप्रसाद व्यवस्था आहे. भक्त निवासामध्ये एक ‘महाप्रसाद’ हॉल देखील आहे जेथे सर्व भक्तांना 12:00 ते 14:00 (विनामूल्य) आणि 20:00 ते 22:00 (विनाशुल्क) महाप्रसाद दिला जातो. इडली/डोसा ते वडा-पाव, संपूर्ण शाकाहारी जेवण ते चायनीज पदार्थ अशा विविध प्रकारच्या मेनू आयटमची ऑफर देणारी भरपूर भोजनालये तुम्हाला येथे मिळतील.

Conclusion

महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान पैकी Narsobachi Wadi हे एक असून नरसोबाच्या वाडीला दत्तात्रय भक्तांची राजधानी म्हणतात. येथील पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले नृसिंह सरस्वती यांचे मंदीर भक्तांना भुरळ पाळते. जर आपण बेत बनवला असेल नरसोबाच्या वाडीला भेट देण्याचा तर एकदा नक्की भेट द्या.

FAQ

नरसोबाची वाडी काय प्रसिद्ध आहे?

Narsoba Wadi मध्ये फक्त श्री नरसिंह सरस्वती यांचे मंदीर सोबतच येथील काही पदार्थ सुद्धा प्रसिद्ध आहेत ते आपण बघू.
कवठ बर्फी, (Desert made from Limonia)
बासुंदी
कंदी पेढे
खोबऱ्याच्या वड्या
कुरडई वड्या

महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर ते नरसोबाची वाडी अंतर किती आहे.?

kolhapur mahalaxmi temple to narsobachi wadi distance हे 84 किमी आहे.

Mahaprasad Timing at Narsobachi Wadi

भक्त निवासामध्ये एक ‘महाप्रसाद’ हॉल देखील आहे जेथे सर्व भक्तांना 12:00 ते 14:00 (विनामूल्य) आणि 20:00 ते 22:00 (विनाशुल्क) महाप्रसाद दिला जातो.

4 thoughts on “Great Narsobachi Wadi Temple Bhakta Niwas and top 10 Hotels Booking”

Leave a comment