Easy Steps to Book Kolhapur Bhakta Niwas Rooms in 2024

कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असून महाराष्ट्रात कोल्हापूरला सांस्कृतिक व राजकीय महत्व आहे. कोल्हापूरचे आराध्य दैवत महालक्ष्मी आहे, महालक्ष्मी मंदिराला Amba Bai Temple सुद्धा म्हणतात. या लेखात आपण Kolhapur Bhakta Niwas या महालक्ष्मी संस्थानद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या रूम बुकींग तसेच रूम भाडे बद्दल माहिती जाणून घेवू.

Table of Contents

About Kolhapur Maharashtra

कोल्हापूर हे शहर महाराष्ट्रातील सांस्कृतिक महत्व असलेले दक्षिण कडील एक जिल्हा असून या शहराला “दक्षिणेची काशी” (Dakshin Kashi) असेही म्हणतात. सदर शहर हे पंचगंगा नदीकाठी वसलेले असून सह्याद्री पर्वत रांगानी वेढलेले आहे.

कोल्हापूर हे गाव भारतीय पौराणिक कथांमध्ये उल्लेख केलेल्या शक्तिपीठांपैकी एक असून या ठिकाणी देवी महालक्ष्मी चे स्थान आहे. पूर्वी कोल्हापूर हे शहर कोल्हापूर संस्थानाची राजधानी व ब्रिटिश साम्राज्याची वसाहत सुद्धा होती. कोल्हापूरची महालक्ष्मी देवी संस्थान असल्यामुळे येथे Kolhapur Bhakta Niwas सुद्धा उपलब्ध आहेत.

Name of CityKolhapur
DistrictKolhapur District
Pincode of Kolhapur416001
STD Code of Kolhapur(0231)
RTO Registration NoMH 09
Corporation Websitehttps://web.kolhapurcorporation.gov.in/

Mythology Behind Kolhapur Name

हिंदू पौराणिक कथांच्या अनुसार केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर (Kolhasur) हा राज्य करीत असतांना त्याने येथील प्रजेवर अन्याय व अत्याचार केले होते. देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मी देवीने त्याच्याशी युद्ध करून त्याचा वध केला. कोल्हासुर राक्षसाने देवीला शरण गेल्यावर त्याने तिच्याकडे एक मागणी केली की आपल्या राज्याची नावे ही जशी आहे तशीच ठेवावी तेव्हा पासून या ठिकाणचे नाव कोल्हासूर राक्षसाच्या नाव वरून कोल्हापूर असे पडले अशी अख्यायिका आहे.

Kolhapur-Bhakta-Niwas

Kolhapur is Famous For

कोल्हापूर हे खालील आपल्या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक बाबींसाठी प्रसिद्ध आहे ते पुढील प्रमाणे आहेत.

  • श्री महालक्ष्मी मंदिर
  • राजवाडे, किल्ले आणि मंदिरे
  • विविध अलंकार
  • सांस्कृतिक विविधता
  • कोल्हापूरी चप्पल
  • ” वारणा दूध प्रकल्प”

Geography of Kolhapur

कोल्हापूर शहराचे तापमान हे सागरी आणि जमिनीवरील हवामान यांचे मिश्र हवामान आहे. येथील हवामान शेजारील शहरांच्या तुलनेत जास्त दमट असल्यामुळे येथील तापमान 10 डिग्री से.ग्रेट ते 35 डिग्री सें. ग्रेट असते. उन्हाळ्यात हे शहर जास्त तापत नाही उन्हाळ्यात या शहराचे तापमान सरासरी 33 ते 36 डिग्री से.ग्रेट असते. हिवाळ्यातले येथील तापमान हे दिवसा २६°सें ते ३२°सेंच्या दरम्यान असते तर रात्री ते ९°सें ते १६°सें पर्यंत खाली जाते.

About Mahalaxmi Temple (Amba Devi Temple)

संपूर्ण भारतातील १०८ शक्तीपीठ असून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक Kolhapur Mahalaxmi Temple आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीला अंबाबाई देवी (Ambabai Devi) सुद्धा म्हणतात. सदर मंदिर हे चालुक्य काळात बांधले गेले असून इ.स. ६०० ते इ.स. ७०० वर्षे पुरातन असल्याचा अंदाज आहे. Mahalaxmi Mandir हे दोन मजली असून संपूर्ण काळया पाषाणात बांधलेले असून कोल्हापूरच्या परिसरात काळा पाषाण भरपूर मिळतो त्याचा वापर मंदिर बांधण्यात करण्यात आला आहे. कोल्हापूरची अंबाबाई ही नवसाला पावणारी जागृत देवस्थान असल्यामुळे याठिकाणी वर्षभर भाविकांची गर्दी आपल्याला पाहवयास मिळते. इतिहासात अशी नोंद आहे की बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी पावणेचोवीस तोळे (जवळजवळ पाव किलो) वजनाचे सोन्याचे चार चुडे देवीला वाहिल्याचा आहेत.

मी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराला जेव्हा भेट दिली तेव्हा तिथलं मन प्रसन्न करून टाकणार वातावरण आणि मंदिराची रेखीव सुंदरता खरच आपल्याला भुरळ पाडते. मी नोंदलेली Kolhapur Mahalaxmi Temple ची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.

Features of Mahalaxmi Temple of Kolhapur

  • सर्वात आधी मी नोंद केली की, Mahalaxmi Temple Kolhapur हे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे.
  • मंदिरात प्रवेश करताच आपल्याला मंदिराचा सभामंडप दिसतो जो लाकडी खांबाचां व कमानीनी बनवलेला आहे सभामंडप आपल्याला मराठा बांधकाम शैलीचा आठवण करून देतो.
  • Mahalaxmi Temple Kolhapur चे चार मुख्य भाग आपल्याला पाहव्यास मिळतात.
  • मंदिरातील सर्वात पुरातन असलेला गाभारा व रंगमंडप हा मंदिराच्या पूर्व भागात असून अंबादेवीचा गाभारा येथेच आपल्याला बघण्यास मिळतो.
  • मंदिराच्या उत्तरेकडे आपण गेलो असता आपल्याला Mahakali Devi (महाकालीचा गाभारा) दर्शन होते.
  • मंदिराच्या दक्षिणेस आपण गेलो असता आपल्याला Mahasaraswati Gabhara (महा सरस्वती गाभारा) दर्शन घेता येते.
  • मंदिराच्या पूर्वेस असणारा गाभारा व रंगमंडप, उत्तरेकडील Mahakali Devi Gabhara आणि दक्षिणेस असलेला Maha Saraswati Gabhara या तिन्ही ठिकाणांना जोडणाऱ्या सभामंडपाला महानाट मंडप असे नाव देण्यात आले असल्याचे आपल्याला दिसते.
  • महालक्ष्मी मंदिराचे डागडुजी केले जाते परंतु मंदिरातील कुठलेही भाग काढून टाकण्यास किंवा पाडण्यास मंजुरी नाही.
  • कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर हे पुरातन असल्यामुळें या मंदिराच्या भिंतीवर आपल्याला कोरीव काम केलेले आढळते.
  • या कोरीव कामात आपल्याला नर्तकी, वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, वीणावादी, आरसादेखी, यक्ष, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले पाहून मन प्रसन्न होते.
  • Mahalaxmi Temple चे दर्शन घेण्यामागचे माझे सर्वात मोठे कारण की, मी एकले होते की माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतात हे बघण्यासाठी मी उत्सुक होतो आणि खरच माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण देवीच्या मुखावर मी स्वतः पडलेले बघून धन्य झालो.
  • Mahalaxmi मंदिराचे वास्तू वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर दगडी बांधकाम हे विनाचुन्याचे करण्यात आले आहे.
  • मंदिर परिसरात आपल्याला, दत्तात्रेय, विष्णू, गणपती वगैरे अनेक देवतांची देवळे बघायला मिळतात.
  • मंदिरात दोन पाण्याची कुंड सुद्धा आपले लक्ष वेधतात त्या पाण्याच्या कुंडाची नावे ही आणि काशी व मनकर्णिका अशी आहेत.
  • दररोज महालक्ष्मी मंदिराला हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी येतात त्यामुळे मंदिर प्रशासनाने त्याच्या राहण्यासाठी Kolhapur Bhakta Niwas उभारले आहे. जर तुम्ही शेगावच्या गजानन महाराज मंदिराला भेट दिली असेल तर शेगावच्या भक्त निवास प्रमाणे येथेही आपल्याला कमी दरात राहण्याची सोय करून दिली जाते.
  • Kolhapur Bhakta Niwas (kolhapur mahalaxmi bhakta niwas) मध्ये AC व Non AC Rooms अत्यल्प दरात आपल्याला मिळते.

How to Reach Mahalaxmi Temple at Kolhapur

मी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी ठरवले आणि त्यानुसार प्लॅनिंग केले मी मुंबई वरून कोल्हापूर जाण्याचा बेत आखला. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असल्यामुळे तुम्ही जागत कुठेही प्रवास करू शकता. मुंबई ते कोल्हापूर हे अंतर मी रेल्वेने जाण्याची प्लॅनिंग केली. या लेखात आपण कोल्हापूर जाण्यासाठी रेल्वे, रोड आणि हवाई मार्ग या तिन्ही मार्गाचे विश्लेषण करू. आधी मी तुम्हाला मुंबई ते कोल्हापूर रेल्वे मार्गाने कसे जायचे हे सांगतो. व मी ठरविले की मुक्काम हा Kolhapur Bhakta Niwas मध्येच करायचा.

Mahalaxmi Temple Google Map

Trains Between Mumbai to Kolhapur

जर आपण मुंबई वरून कोल्हापूर जात असाल तर आपल्याला रेल्वे ने जाणे फार सोयीस्कर आहे कारण मुंबई ते कोल्हापूर रोड मार्गे अंतर हे जवळ जवळ ४२६ किलो मिटर आहे. इतके लांब अंतर कार पार करण्यासाठी जवळ जवळ १० तास लागतात त्यामुळे थकवा निर्माण होतो, परिणामी आपल्याला Kolhapur Mahalaxmi Mandir बघण्याचीसाठी जी एनर्जी पाहिजे ती काहीशी कमी होते. रेल्वे ने आपण आरामशीर झोपून आपला प्रवास पूर्ण करू शकतो. कोल्हापूरला पोहचल्यावर मी ठरवले होते की Kolhapur Bhakta Niwas मध्ये खोली घेवून आपले पुढील नियोजन करावे.

याकरीता मी कोल्हापूरला अंबा देवीचे दर्शन घेण्यासाठी रेल्वे ने जाण्याचा निर्णय घेतला. खाली तुम्ही मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस वरून कोल्हापूर जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या ट्रेनची लिस्ट बघू शकता.

Chatrapati Shivaji Maharaj Terminus to Chatrapati Shahumaharaj Terminus Kolhapur Trains

Train Name & No.DaysFare of Sleeper Class
11029 Koyna ExpressDaily₹ 315/-
17411 Mahalaxmi ExpressDaily₹ 315/-
11049 Kolhapur Express Monday₹ 315/-
Chatrapati Shivaji Maharaj Terminus to Chatrapati Shahumaharaj Terminus Kolhapur Trains

Mumbai ते कोल्हापूर जाण्यासाठी वरील तीन ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरून आहेत. पैकी मी रोज धावणारी 11029 Koyana Express ने मुंबई ते कोल्हापूर प्रवास करून महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्याचे ठरविले.

Mumbai to Kolhapur Train Traveling Experience by 11029 Koyna Express

मी आई अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी उस्तुक झालो होतो, त्यानुसार आधीच माझ्या प्रवासाची मी आखणी केली होती, मी CSMT वरून कोयना एक्सप्रेस ने कोल्हापूर जाण्यासाठी आधीच तिकीट बूक करून घेतले होते. सर्व सामान व्यवस्थित बांधून माझा प्रवास मुंबई ते कोल्हापूर सुरू झाला. कोयना एक्सप्रेस ही CSMT वरून सकाळी ०८.४० मिनिटाला निघते व जवळजवळ १२ तासांनी कोल्हापूरला पोहचते.

कोयना एक्सप्रेस CSMT वरून आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिट उशिरा सुटली , माझं रिझर्व्हेशन असल्याकारनाणे मला शिट शोधण्याची गळबल नव्हती. कोयना एक्सप्रेस मध्ये pantry car नाही हे मला आधीच माहीत असल्यामुळे मी घरूनच दुपारचे जेवण घेतले होते. माझी तारांबळ तेव्हा उडाली जेव्हा मला माझा कोच नेमका इंजिन पासून कितव्या नंबर वर आहे हे कळाले नाही. परंतु रेल्वे स्टेशन वरील कोच डिस्प्ले मुळे मला माझा कोच मिळाला.

Over Look of Koyna Express 11029

Train Name11029 Koyna Express
CoachesFirst AC
2nd tier AC
3rd tier AC
Sleeper coach
Unreserved
Total Coaches24 Nos.
Duration12 hrs 20 mins
Total Stops35
Pantry CoachNot Available
Major Station PassesKALYAN JUNCTION,
PUNE JUNCTION,
DADAR.
Over Look of Koyna Express 11029

Mumbai to Kolhapur Koyna Express Coach Position from Engine

आपले सुद्धा गोंधळ होवू नये म्हणून मी झाली कोयना एक्सप्रेसची इंजिन पासूनची कोच स्थिती चार्ट देत आहे. यावरून आपल्याला आपला कोच इंजिन पासून कितव्या नंबर वर आहे हे कळेल.

Kolhapur-Bhakta-Niwas

11029 Koyna Express has Pantry Car ?

कोयना एक्स्प्रेसला पॅन्ट्री कार नाही. हे मला आधीच माहीत असल्यामुळे मी सोबत घरून निघताना दुपारचा जेवणाचा डबा घेतला होता. रात्रीच्या जेवणासाठी ट्रेन काही मोठ्या स्टेशन वर थांबते तेथे आपण प्लॅटफॉर्म वरून नाश्ता व जेवण विकत घेवु शकतो.

Mumbai to Kolhapur Koyna Express Stops

जर तुम्हीसुद्धा मुंबई ते कोल्हापूर अंबादेवी दर्शनासाठी जात असाल आणि कोयना एक्सप्रेस ट्रेन ने प्रवास करत असाल तर मी तुम्हाला मुंबई ते कोल्हापूर ट्रेन चे किती थांबे (Stops) आहेत व कोयना एक्सप्रेस ही किती वाजता कोणत्या रेल्वे स्टेशन वर पोहचते हे खाली दिलेल्या टेबल वरून दाखविण्याचा प्रयत्न करत आहे.

Name of Station ArrivalDeparture
Mumbai CstStart08:40
Dadar08:5108:53
Thane09.1309.15
Kalyan Junction09.3309.35
Neral10.0310.05
Karjat10.1810.20
Khandala10.5811.00
Lonavala11.0811.10
Talegaon11.3811.40
Chinchwad11.5812.00
Khadaki12.1012.12
Shivaji Nagar12.1812.20
Pune12.4012.45
Ghorpuri12.5012.55
Jejuri13.4813.50
Nira14.2014.22
Lonand14.3014.32
Wather15.1015.12
Satara15.5716.00
Koregaon16.1216.14
Rahimatpur16.2416.26
Targaon16.3816.40
Masur16.5216.54
Shirvade17.0117.03
Karad17.2117.23
Takari17.5217.54
Kirloskarwadi18.0818.10
Bhilavdi18.2318.25
Sangli18.4218.45
Miraj19.0519.10
Jaysingpur19.2119.23
Hatkanagale19.4019.42
Rudaki19.5019.52
Valivade19.5820.00
C Shahumharaj T Kolhapur20.25End
Mumbai to Kolhapur Koyna Express Stops

वरीलप्रमाणे माझा प्रवास मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सकाळी 8.40 वाजता सुरू झाला व जवळजवळ 11 तासाने मी आई अंबादेवीच्या दर्शनासाठी कोल्हापूर येथे पोहचलो.

How to Reach Mahalaxmi Temple Kolhapur by Road

जर तुम्हीं कोल्हापूर अंबादेवी दर्शनासाठी बाय रोड जात असाल तर खाली तुम्हाला महाराष्ट्रातील मोठ्या शहरातून कोल्हापूरला जायायला किती वेळ आणि किती अंतर आहे हे कळेल.

Name of CityDistanceHrs.
Mumbai To Kolhapur379 KM7 Hrs
Borivali to Kolhapur402 KM8 Hrs
Pune to Kolhapur233 KM4 Hrs 36 Min
Nagpur to Kolhapur934 KM14 Hrs 30 Min
Aurangabad to Kolhapur543 KM8 Hrs 43 Min
Satara to Kolhapur124 KM2 Hrs 46 Min

How to Reach Mahalaxmi Temple Kolhapur by Air

कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराच्या सर्वात जवळचे विमानतळ कोल्हापूर देशांतर्गत विमानतळ, जे सुमारे 10 किमी अंतरावर आहे. कोल्हापुरच्या आग्नेयेस सुमारे 9 किमी अंतरावर उजळाईवाडी (Ujlaiwadi) येथे विमानतळ आहे. कोल्हापूर विमानतळावर मुंबई, तिरुपती, हैदराबाद, बेळगाव, बेंगळुरू.अशी देशांतर्गत उड्डाणे आहेत: तुमच्या Kolhapur Mahalaxmi Temple किंवा Kolhapur Bhakta Niwas येथे पोहोचण्यासाठी तुम्ही विमानतळावरून कॅब किंवा ऑटो रिक्षा भाड्याने घेऊ शकता.

Mahalaxmi Temple Kolhapur Festivals

कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात होणारे उत्सव हे खालील प्रमाणे आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून भाविक या उत्सवात सहभागी होतात.

Sharadiya Navaratrotsav (Nine Devine Nights):

शारदीय नवरात्रोत्सव (नऊ दिव्य रात्री): निसर्गाच्या वार्षिक चक्राशी संबंधित जवळजवळ सर्व हिंदू सण साजरे केले जातात. शारदीय नवरात्रीचा शब्दशः अर्थ; शरदचे स्वागत; हिवाळा हंगाम. कोल्हापूरची देवी अंबाबाई (महालक्ष्मी) चा एक अतिशय प्रमुख उत्सव. हा उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होतो आणि खंडेनवमीपर्यंत चालू राहतो.

Mahalaxmi Palakhi

पालखी सोहळा : दर शुक्रवारी रात्री 9.30 वाजता देवीची उत्सवमूर्ती मंदिरात प्रदक्षिणा करतात. हा पालखी सोहळा नवरात्रीत नऊ दिवस चालतो.

Lalita Panchami

ललिता पंचमी: पाचव्या दिवशी, जेव्हा देवी त्र्यंबोली मंदिरात येते तेव्हा ललिता पंचमी साजरी केली जाते. हे शहराच्या बाहेरील भागात वसलेले आहे. नगर प्रदक्षिणा: देवीची उत्सवमूर्ती रथात नगर प्रदक्षिणा करतात.

Vijaya Dashami

विजया दशमी: विजया दशमी (दसरा) करवीर संस्थानच्या राजेशाही थाटात साजरी केली जाते. यावेळी देवीच्या पालखी प्रसिद्ध दसरा चौकाला भेट देतात जिथे दसरा उत्सव सुरू होतो. कार्यक्रमानंतर, पालखी पंचगंगा नदीला भेट देते आणि मंदिरात परत येते.

Mahalaxmi Rathotsav

रथोत्सव : दरवर्षी चैत्र वद्य प्रतिपदेला (श्री जोतिबा यात्रेचा दुसरा दिवस); देवी नगर प्रदक्षिणा करते. हजारो भाविकांनी दान केलेल्या चांदीपासून बनवलेल्या नव्या रथाचा वापर रथोत्सवासाठी केला जातो.

Kolhapur Mahalaxmi Temple Timings

Kolhapur Bhakta Niwas बुक केल्यावर सर्वात आधी मी Kolhapur Mahalaxmi Temple Timings म्हणजे कोल्हापूर मंदिराची दिनचर्या जाणून घेतली कारण मंदिराच्या दिनचर्या नुसार आपण आपल नियोजन करू शकतो. तर चला तुम्ही सुध्दा जाणून घ्या Kolhapur Mahalaxmi Temple Timings.

TimeMahalaxmi Temple Rituvals
4.00 AMमंदिर उघडते
5:00 AMPadyapuja & Mukhmarjan पद्यापुजा आणि मुखमर्जन
5:30 AM TO
6:00AM
काकड आरती
नैवेद्य :- लोणी आणि साखर
सकाळी मंदिर उघडल्यानंतर पहाटे 5.30 वाजता देवीचे मुखमर्जन आणि पादुकांची पूजा,
लोणी आणि साखर अर्पण करून देवीची काकड आरती सुरू होते.
8:00 AMपहाटेची महापूजा
सकाळी 8.30 वाजता घंटा वाजवून देवीला पंचामृत अभिषेक, षोडशोपचार पूजा आणि खिर नैवैद्य अर्पण केले जाते.
9:30 AM देवीला नैवैद्य अर्पण केले जाते.
11:30 AMदुपारी महापूजा
पंचामृत अभिषेक षोडशोपचार पूजा सकाळी 11.30 वाजता आणि महानैवैद्य पुरणपोळी येथे
शुक्रवारी रात्री 8.15 वाजता मंगलआरती सुरू होते.
01:30 PMअलंकार पूजा
देवीला महावस्त्र अर्पण करून आणि देवीच्या अंगावर पारंपरिक सोन्याचे दागिने घालून अलंकार पूजा केली जाते.
08:00 PMधुपारती
रात्री 8 वाजता घंटा वाजते आणि सकाळी 8.15 वाजता सुरुवात होते आणि श्री लाडूकारंजाचा नैवैद्य अर्पण केल्यानंतर शंखतीर्थ केले जाते.
10:00 PMशेजारती
रात्री 10.15 वाजता शेजारी दूध-साखर द्यायचे. रात्री 10.30 वाजता मंदिर बंद होते.

Kolhapur Mahalaxmi Live Darshan

ज्या भाविकांना काही कारणास्तव महालक्ष्मी देवीचे प्रत्यक्ष दर्शन घेणे काही कारणास्तव जमत नाही अश्या भाविकांसाठी मंदिर प्रशासन द्वारे अंबा देवीचे kolhapur live darshan घेण्याचे सोय केली आहे. आपण आपल्या मोबाईल वरून Kolhapur Mahalaxmi Live Darshan घेवू शकतात. या सुविधेचा फायदा रोज लाखो भक्त घेतात.

Devasthan Management Committee, Western Maharashtra, Kolhapur यांनी महालक्ष्मी देवीचे लाईव्ह दर्शंची सोय करून दिल्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहील. कारण Kolhapur Live Darshan चा लाभ संपूर्ण महाराष्ट्राला नव्हेच तर भारतातील असंख्य भाविकांना होत आहे.

How to Reach Kolhapur Mahalaxmi Temple from Kolhapur Railway Station

मी रात्री कोयना एक्सप्रेस ने रात्री 21.00 वाजता कोल्हापूर रेल्वस्थानकावर पोहचलो गाडी आपल्या निर्धारित वेळे पेक्षा अर्धा तास उशिरा पोहचली. सर्वात आधी मी रेल्वे स्थानकावर थोडा नाष्टा केला त्यानंतर मी आधीच ठरविल्याप्रमाणे Kolhapur Bhakta Niwas गाठण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो. कोल्हापूर रेल्वे स्टेशन ते महालक्ष्मी मंदिर हे अंतर जवळपास 3.3 किलो मिटर आहे मंदिरात जायला रेल्वस्थानकावरून जवळपास 13 मिनिट लागतात.

Rout Map of Kolhapur Railway Station to Mahalaxmi Temple

रेल्वेने उतरल्यावर सर्वात आधी मी रेल्वस्थानकाच्या बाहेर पडलो आणि तेथून पुढे मंदिरापर्यंत कसा प्रवास करायचा हे खाली दिलेले आहे.

  • कोल्हापूर रेल्वे स्टेशन बाहेर आल्यावर मी ऑटो केला त्यानंतर कोल्हापूर रेल्वे स्टेशन ते कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर प्रवास सुरू झाला.
  • ऑटो पश्चिम कडे वळल्यावर मुख्य रस्त्यावर पोहचलो.
  • 350 मीटर पुढं गेल्यावर डावीकडे वळल्यावर NH 166/ NH 166G वर ऑटो लागल्यावर डाव्या बाजूला Dattaguru Gharguti Jevan म्हणून एक हॉटेल वजा मेस आहे तेथून आपण घरगुती जेवण करू शकतात.
  • आणखी 240 मीटर पुढे गेल्यावर मल्हार चहा पासून डावी बाजूला वळावे लागते.
  • पुढे 360 मीटर गेल्यावर Gavat Mandai Road वरून जावे लागते.
  • येथून पुढे उजवी कडे वळल्यावर Tembe Road लागेल.
  • जवळपास 450 मीटर सरळ गेल्यावर अल्लादिया खान साहेब पुतळ्या पासून MH SH 116 वर डावी कडे वळावे.
  • जसे जसे मी मंदिराच्या जवळ जवळ पोहचत होती तसा तसा रस्ता अरुंद होत होता.
  • पुढे 250 मीटर वरून उजवी कडे वळल्यावर Sagar Galli road वर मी पोहचलो.
  • Nivruti Chowk वरून डावीकडे वळल्यावर सुमारे 450 मीटर पुढे गेल्यावर मी Kolhapur Mahalaxmi Temple येथे पोहचलो.

How to Reach Kolhapur Bhakta Niwas (Mahalaxmi Dharmashala)

मी आधीच ठरविले होते की महालक्ष्मी मंदीर दर्शन घेण्यासाठी जेव्हा कधी कोल्हापूरला जाईल तेव्हा मंदिर प्रशासनाचे Kolhapur Bhakta Niwas मध्येच राहील. त्यानुसार माझी पुढची धडपड होती Kolhapur Bhakta Niwas गाठायची. त्यानुसार मी ऑटो ने कोल्हापूर भक्त निवास येथे पोहचलो.

Kolhapur Bhakta Niwas

अंबादेवी मंदिराच्या 10 ते 15 पावलांच्या दुरिवर Mahalaxmi Dharmashala आहे. महालक्ष्मी धर्मशाळा सारख्या एकूण तीन धर्मशाळा कोल्हापूर मध्ये आहेत. येथे भाविकांना राहण्यासाठी अत्यंत कमी दरात खोल्या भाड्याने मिळतातं.

Kolhapur Bhakta Niwas Online Booking Update

kolhapur Mahalaxmi मंदिर दर्शनासाठी जर आपण येत असाल तर लक्षात ठेवा की Kolhapur Bhakta Niwas हे Online Booking सुविधा हि उपलब्ध नाही. तुम्हाला Kolhapur Mahalaxmi Dharmashala येथे येवून भक्त निवास बुक करावे लागेल.

How to Book Mahalaxmi Dharmashala in Kolhapur

कोल्हापूर धर्मशाळा म्हणजेच महालक्ष्मी धर्मशाळेची निर्मिती ही सन १९५४ मध्ये झाली असून एक कोल्हापूर मध्ये असणाऱ्या तीन धर्मशाळा पैकी एक आहे. या धर्मशाळेत ऑनलाईन पद्धतीने खोल्या बुक होत नाहीत. आपल्याला Mahalaxmi Dharmashala मध्ये येवूनच खोली बुक करावी लागते. त्यानुसार मी या महालक्ष्मी धर्मशाळा सर्वात आधी गाठली.

महत्वाची टीप:- श्री महालक्ष्मी धर्मशाळा, कोल्हापूर ही २४ तास भविंकासाठी खुली असते.

Kolhapur Bhakta Niwas मध्ये प्रवेश करताच मला ही धर्मशाळा किती भव्य आणि नीट नेटकी आहे हे बघायला मिळाले. धर्मशाळेत प्रवेश करताच मला रिसेप्शन काउंटर दिसले. Kolhapur Dharmashala Office हे तळ मजल्यावर आहे. रिसेप्शन काउंटर वर पोहताच मला ऑफिस मध्ये bhakt niwas kolhapur मधील विविध खोल्यांचे दर लावलेले फलक दिसले. त्या फलकांवर भक्त निवास मधील विविध खोल्यांचे दर अगदी ठळक अक्षरात लिहलेले होते.

रिसेप्शन काउंटर वर मला एक सज्जन भेटले त्यांनी माझे अगदी हसत मुखाने स्वागत केले. त्यांनी मला या भक्त निवसातील खोल्यांचे दर व bhakt niwas in kolhapur तील नियम व अटी यांची माहिती दिली. जसे की या भक्त निवास मध्ये डिलक्स रूम, अटॅच रूम, साधी रूम आणि एसी रूम उपलब्ध आहेत.

Kolhapur Bhakta Niwas
Kolhapur Bhakta Niwas

Kolhapur Bhakta Niwas Room Rent

माझ सर्व कुतूहल हे बघण्यात होत ही Kolhapur Bhakta Niwas मध्ये असणाऱ्या विविध खोल्यांचे भाडे किती आहे. कारण Kolhapur Mahalaxmi Bhakta Niwas मधील खोल्यांच्या दरावर मी कुठली रूम बुक केली पाहिजे हे ठरणार होत.

रिसेप्शन वर जे कर्मचारी होते त्यांनी माझे कुतूहल शांत केले म्हणजेच मला Bhakt Niwas in Kolhapur मध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व खोल्यांची माहिती सांगितली इतकेच नव्हे तर ती माहिती फलकावर सुद्धा लिहिली होती. यावरून मला हे समजले की कोल्हापूर भक्त निवासात Bhakta Niwas in Shegaon प्रमाणे कुठलाही फसवा फसविचा प्रकार होत नाही.

Kolhapur Bhakta Niwas
Kolhapur Bhakta Niwas

Bhakta Niwas in Shegaon Room Rent Chart

आपल्या सोयीसाठी मी खाली Kolhapur Bhakta Niwas मधील विविध प्रकारच्या खोल्यांचे तपशील आणि कोल्हापूर भक्त निवास रूम रेट्स देत आहे. यावरून तुम्हाला एक माहिती मिळेल की तेथील खोल्यांचे दर २४ तास करीता किती आहेत.

Simple Room in Kolhapur Bhakta Niwas

PersonsRate for 24 Hrs.
4 PersonRs 520/-
5 PersonRs 650/-
Extra per PersonRs 130/-

Attached Room in Kolhapur Bhakta Niwas

Kolhapur Bhakta Niwas मध्ये जर आपण attached room घेतली तर त्यात संडास बाथरुम attach असते.

PersonRate for 24 Hrs
4 PersonsRs 820/-
5 PersonRs 1025/-
6 PersonRs 1230/-
Extra per PersonRs 205/-

AC Room in Kolhapur Bhakta Niwas

PersonRate for 24 Hrs
4 Person Rs 1180/-

Deluxe Room in Kolhapur Bhakta Niwas

PersonRate for 24 Hrs
3 PersonRs 720/-
5 PersonRs 1200/-
6 PersonRs 1440/-
Extra Per PersonRs 240/-

Mahalaxmi Bhakta Niwas Kolhapur Contact Number

मित्रांनो जर तुम्ही अंबादेवी कोल्हापूर दर्शन घेण्याचे प्लॅनिंग केले असेल तर आणि Kolhapur Bhakta Niwas येथे रूम घ्यावयाचे असेल तर लक्षात असू द्या की Mahalaxmi Bhakta Niwas Kolhapur किंवा kolhapur mahalaxmi dharamshala online booking Online Room Booking मध्ये सेवा उपलब्ध नाही. तुम्हाला भक्त निवासात येवूनच रूम बुक करता येईल.

मी खाली Mahalaxmi Bhakta Niwas Kolhapur Phone number देत आहे. या फोन नंबर वर कॉल करून तेथे रूम उपलब्ध आहेत किंवा नाही याची चौकशी करता येईल.

Shri Mahalaxmi Bhakta Mandal , Opp. Mahalaxmi Temple (West),Tarabai Road, 3007 ‘A’ Ward, Near Kapiltirth Market, Kolhapur 416012.

Mahalaxmi Bhakta Niwas Kolhapur Contact Number: 0231 262 6377

Conclusion

कोल्हापूर महालक्ष्मी देवीचे दर्शन घेवून मी खरच धन्य झालो. Kolhapur Bhakta Niwas मधील कर्मचारी यांचा मनमिळावू स्वभाव तसेच भक्त निवास मधील स्वच्छता बघून मन प्रसन्न झाले. शेवटी मी असेच म्हणेन की जर तुम्ही सुध्दा Kolhapur Mahalaxmi Darshan करण्यासाठी येत असाल तर कृपया Kolhapur Bhakta Niwas मध्येच मुक्काम करा.

FAQ

Kolhapur Bhakta Niwas rate

Kolhapur Bhakta Niwas मध्ये Single Room, Attached Room, AC Rooms आणि Delux Room उपलब्ध असून यांचा रेट ₹ 520/- ते ₹ 1440/- या प्रमाणे आहे.

Kolhapur Bhakta Niwas contact details

Mahalaxmi Bhakta Niwas Kolhapur Phone number देत आहे. या फोन नंबर वर कॉल करून तेथे रूम उपलब्ध आहेत किंवा नाही याची चौकशी करता येईल. Mahalaxmi Bhakta Niwas Kolhapur Contact Number: 0231 262 6377

Kolhapur Mahalaxmi Bhakta Niwas Online Booking

अंबादेवी कोल्हापूर दर्शन घेण्याचे प्लॅनिंग केले असेल तर आणि Kolhapur Bhakta Niwas येथे रूम घ्यावयाचे असेल तर लक्षात असू द्या की Mahalaxmi Bhakta Niwas Kolhapur किंवा kolhapur mahalaxmi dharamshala online booking Online Room Booking मध्ये सेवा उपलब्ध नाही. तुम्हाला भक्त निवासात येवूनच रूम बुक करता येईल.

Is it Mahalaxmi or Ambabai?

Kolhapur Mahalaxmi देविलाच Ambabai म्हणतात.

How old is Ambabai temple in Kolhapur?

मंदिर हे चालुक्य काळात बांधले गेले असून इ.स. ६०० ते इ.स. ७०० वर्षे पुरातन असल्याचा अंदाज आहे.

Kolhapur Dharamshala Room price

Kolhapur Bhakta Niwas मध्ये Single Room, Attached Room, AC Rooms आणि Delux Room उपलब्ध असून यांचा रेट ₹ 520/- ते ₹ 1440/- या प्रमाणे आहे.