महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांपैकी पंढरपूर येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिर हे एक आराध्य दैवत आहे. दरवर्षी लाखो भक्तगण मविठ्ठल रूक्मिणी देवस्थान यांच्या वतीने भाविकांसाठी Pandharpur Darshan Pass ची सुविधा सुरू केलेली आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात.
संपूर्ण महाराष्ट्रातून विविध देवस्थानांच्या दिंड्या ह्या आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठू माऊलीला भेटण्यासाठी पंढरपूर कडे प्रस्थान करतात. श्री संत गजानन महाराज यांची पालखी सुध्दा पंढरपूर कडे प्रस्थान करते.
या लेखाच्या माध्यमातून आपण Pandharpur Darshan Pass बुकिंग कशी केली जाते याबाबतीत सविस्तर माहिती घेवू.
How to reach Pandharpur Temple
पंढरपूरला श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आपण रेल्वेमार्ग, रोड मार्गे तसेच हवाई मार्गे पोहचू शकतो.
By Road
पंढरपूर हे देवस्थान महाराष्ट्रतील एक प्रसिद्ध देवस्थान असल्यामुळे हे आपण रोड मार्गाने पंढरपूरला सहज पोहचू शकतो. पंढरपूर जवळ सोलापूर हे मोठे शहर असून सोलापूर ते पंढरपूर अंतर केवळ ७४ किमी आहे.
By Train
पंढरपूरला आपण लोहमार्ग म्हणजे रेलवेद्वारे सुध्दा पोहचू शकतो, कुरुडवाडी हे रेल्वेचे जंक्शन पासून पंढरपूर जवळ असल्याने आपण सहज पंढरपूरला पोहचू शकतो.
By Air
सोलापूर येथे विमानतळ असल्यामुळे आपण भारतातून विमान मार्गाने सोलापूर येथे पोहचून सोलापूर ते पंढरपूर हा ७४ किमी प्रवास करु पंढरपूरला पोहचू शकतो.
Pandharpur temple timing
“विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची” लाखो वारकरी त्याचप्रमाणे भक्तगण दरवर्षी पंढरपूर दर्शनासाठी येत असतात पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आषाढी एकादशीला मंदिरामध्ये सपत्नीक पुजा करतात. दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये यात्रेला सुरुवात होते.
चला तर बघूया पंढरपूर देवस्थानाचे वेळापत्रक कसे असते जेणेकरून आपल्याला ऑनलाइन दर्शन पासबुक करताना टाइमिंग स्लॉट व्यवस्थित बघून बुक करता येईल.
Daily Schedule and Activity of Pandharpur Temple
वेळ | पुजा आणि विधी |
पहाटे ४.०० | नामदेव पायरीचे गेट उघडणे. |
पहाटे ४.३० | विठ्ठल रुक्मिणीचे काकड भजन |
पहाटे ४.३० ते ५.३० | नित्यपूजा |
सकाळी ६.०० | दर्शनाची वेळ |
Pandharpur temple Timings and Schedule of Nityopchar
वेळ | पुजा आणि विधी |
सकाळी ४.३० ते ६.०० | श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचे काकडा भजन आणि नित्यपूजा सकाळी |
सकाळी ११.०० ते ११.१५ पर्यंत | महानैवेद्य |
दुपारी ४.३० ते ५.०० वा | पौषाख |
संध्याकाळी ६.४५ ते ७.०० पर्यंत | धूप आरती |
दुपारी ११.३० ते १२.०० वा | शेज आरती |
Pandharpur Temple Timing during Ekadashi, Yatras and Festivals.
आषाढी एकादशी, अन्य सण आणि यात्रेच्या वेळेस श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वेळा पत्रकात बदल केले जात ते खालील प्रमाणे.
वेळ,पुजा आणि विधी |
सकाळी ६.०० ते ११.०० (महानैवेद्यासाठी सकाळी ११.०० ते ११.१५ या वेळेत दर्शन बंद असते) |
सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.३० (पोशाखसाठी ते दुपारी ४.३० ते ५.०० या वेळेत बंद असते) |
संध्याकाळी ५.०० ते ११.१५ (रात्री ११.४५ नंतर ते बंद राहते) |
About Pandharpur Darshan Pass
संपूर्ण देशभरातूनच नव्हे तर जगातून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शना भाविक येत असतात यामुळे यांच्या राहण्याच्या व दर्शनाच्या सोयीसाठी मंदिर संस्थानाने वारकऱ्यांना श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन सहज व्हावे व दर्शन करताना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी पंढरपूर दर्शन पास ही एक नवीन संकल्पना सुरू करण्यात आलेली आहे.
या संकल्पनेनुसार भाविकांना आता आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप वापरून पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन हे ऑनलाईन पद्धतीने दर्शन पास घेऊन करता येईल.
How to Book Pandharpur Darshan Pass
पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाने Darshan Pass सुरू केलेले आहेत, या पासचा उपयोग करून आपण ऍडव्हान्स मध्ये श्री विठ्ठल रुक्माई चे दर्शन बुकिंग करू शकतो.
Pandharpur Darshan Pass बुक करण्यासाठी मध्ये आपण ऑनलाइन म्हणजेच मोबाईल किंवा कम्प्युटर च्या माध्यमातून आपली प्राथमिक माहिती आणि मोबाईल नंबर देऊन ही दर्शन पास घेऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे ही दर्शन पास अगदी निशुल्क आहे.
Process of Pandharpur Darshan Pass
- पंढरपूर दर्शन पास बुक करण्यासाठी आपल्याला मंदिर प्रशासनाच्या मुख्य वेबसाईटला भेट द्यावी लागेल. संस्थानाच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
- वेबसाईट ओपन झाल्यावर तुमच्या समोर खालील प्रमाणे इंटरफेस दिसेल.
3. यानंतर ” ऑनलाइन दर्शन पास बुकींग येथे क्लिक करा” यावर क्लिक करावे.
4. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर खालील प्रमाणे इंटरफेस ओपन होईल.
5. आता “For Ticket Booking” या चिन्हावर क्लिक करा.
6. तेथे क्लिक केल्यावर तुमच्या समोर खालील प्रमाणे इंटर फेसओपन होईल.
7. ही मुख्य स्लाईड आहे, यात आपली वैयक्तिक माहिती नीट भरा जसे की,
- Booking Date ( दर्शन घेण्याची तारीख)
- First Name (तुमचे नाव)
- Middle Name (वडिलांचे नाव)
- Surname (आडनाव)
- Address (पत्ता)
- Email (ई मेल आयडी)
- Country (देश भारत सिलेक्ट करा)
- State (राज्य)
- City ( शहर)
- Pincode (पिनकोड)
- Phone (फोन नंबर असल्यास)
- Mobile (मोबाईल नंबर)
- तुमचा एक फोटो येथे अपलोड करावा लागेल.
8. वरील सर्व माहिती व्यवस्थित भरून आपला एक फोटो अपलोड करून “Book Ticket” या बटणावर क्लिक करा.
9. बुक तिकीट या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक Booking No मिळेल तो तुम्ही लिहून ठेवा कारण हाच नंबर तुम्हाला तुमचे Pandharpur Darshan Pass प्रिंट आऊट काढण्यासाठी उपयोगी पडेल.
10. तुम्हाला जर प्रिंट काही कारणास्तव नंतर काढावयाची आहे, किंवा तुमची Pandharpur Darshan Pass ची प्रिंट हरवली असल्यास तुम्ही तुमचा Pandharpur Darshan Pass Booking नंबर वापरून पुन्हा Darshan Pass ची प्रिंट काढू शकतात.
11. पंढरपूर दर्शन पासाची प्रिंट काढण्यासाठी खालील दिलेल्या ” For Ticket Printing” या ऑप्शनला क्लिक करा.
12. त्यावर क्लिक केल्यानंतर खालील प्रमाणे इंटरफेस ओपन होईल.
13. आता “Enter Ticket No” च्यापुढे आपला Pandharpur Darshan Pass Booking No टाका व Print या बटणावर क्लिक करा.
14. तुमचा दर्शन पास हा PDF च्या स्वरूपात तुम्हाला डाऊनलोड झालेला मिळेल.
Pandharpur Darshan Pass Fees
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासनाने वारकरी, भक्तगणांना विठू रुक्मीणी चे दर्शन सहज घेता यावे या करीता Online Pandharpur Darshan Pass सुविधा सुरू केली आहे. या संकल्पनेनुसार आपण आपल्या मोबाईल किंवा कॉम्पुटर वरून अगदी सहज पंढरपूर दर्शन पास बुक करू शकतो.
पंढरपूर दर्शन पास ही सेवा मंदिर प्रशासनाने निःशुल्क ठवली आहे.
Online Pandharpur Darshan Ticket Slots
पंढरपूर दर्शन पास चे स्लॉट खालील प्रमाणे आहेत, तिकीट स्लॉट प्रमाणे आपण आपले पास ऑनलाइन पद्धतीने बुक करु शकतात.
Darshan From | Darshan To | Available Ticket |
सकाळी ६.०० | सकाळी ७.०० | ५०० |
सकाळी ८.०० | सकाळी ९.०० | ५०० |
सकाळी १०.०० | सकाळी ११.०० | ५०० |
दुपारी १२.०० | दुपारी .१.०० | विश्रांती |
दुपारी ०१.०० | दुपारी २.०० | ५०० |
दुपारी ३.०० | दुपारी ४.०० | ५०० |
दुपारी ५.०० | सायंकाळी ६.०० | ५०० |
रात्री ७.०० | रात्री ८.०० | ५०० |
Important Guidelines for Devotees
- पंढरपूर दर्शन पास बुक करतांना कृपया अँडव्हान्स मध्ये पास बुक करा.
- Pandharpur Darshan Pass बुक करतांना आपण नियोजित केलेल्या तारखेच्या दिन दिवस आधी पास बूक करा.
- पास बुक करतांना ऑनलाइन अपलोड करण्याकरिता आपला फोटो हा कमीत कमी साइजचा असावा.
- पोर्टलवर मागितलेली सर्व माहीती ही अचूक भरा. जसे नाव, गाव, मोबाईल नंबर, राज्य, शहर आणि पत्ता इत्यादी.
- विठू माऊलीच्या दर्शनला येतांना आपला दर्शन पास सोबत ठेवावा.
- दर्शन पास बिना माऊलीचे दर्शन घेता येणार नाही.
- Pandharpur Darshan Slot निवडतांना योग्य slot निवडा. त्यानुसारच प्रवेश मिळेल.
Pandharpur Darshan Duration
जर आपण Online Pandharpur Darshan Pass काढला असेल तर आपल्याला श्री विठ्ठल रुक्मिणीचें दर्शन घेण्यासाठी ४५ ते ६० मिनिटे लागतील.
विना ऑनलाइन दर्शन पास ने दर्शन घ्यायला गेल्यास आपल्याला जवळपास २ ते ३ तास लागतील करीता माऊलीचे दर्शन घेण्यासाठी Darshan Pass घेवून दर्शनाला जा.
Pandharpur Darshan Pass FAQ
Fees for Pandharpur Darshan Pass
पंढरपूर दर्शन पास सेवा संस्थानाने निःशुल्क ठेवली आहे.
पंढरपूर दर्शन पास असल्यास दर्शनासाठी वेळ किती लागतो.
जर आपण Online Pandharpur Darshan Pass काढला असेल तर आपल्याला श्री विठ्ठल रुक्मिणीचें दर्शन घेण्यासाठी ४५ ते ६० मिनिटे लागतील.
Pandharpur Dress Code
Pandharpur मंदिरात स्पेशल कुठलाही ड्रेस कोड नाही. आपण कुठलाही सभ्य पोशाख घालून दर्शन घेवू शकतो.
Howmany days advance for on line Booking
Details and Link given in post…🙏
Hi do we have to book online ticket for children below 12 years