Great Shree Dev Kunkeshwar Mandir Bhakta Niwas 2024

नमस्कार मित्रांनो , आपण महाराष्ट्र राज्यातील एक निसर्गरम्य ठिकाणी वसलेले शंकराचे एक प्राचीन मंदिर Kunkeshwar Mandir बद्दल माहिती घेणार आहोत. कुणकेश्वर मंदिर हे प्रमुख शिव मंदिरांपैकी मानले जाते. कुणकेश्वर मंदिर महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर या गावात आहे.

About Kunkeshwar Village

महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिव मंदिरांपैकी एक श्री कुणकेश्वर शिव मंदिर एक जागृत शिव मंदिर आहे. चला तर जाणून घेवूया कुणकेश्वर गावाची माहिती.

Name of VillageKunkeshwar
TahsilDevgad
DistrictSindhudurg
StateMaharashtra
PincodeKunkeshwar Pincode 416612
STD Code(02364)
Devgad Bus Stand Contact Number02364-262228
RTO Vehicle Registration No.MH-07
Kunkeshwar

History of Kunkeshwar Mandir

Kunkeshwar Mandir विषयी एक दंत कथा प्रचलित आहे, फार पूर्वी एक अरबी व्यापारी आपले जहाज घेवून अरबी समुद्रातून प्रवास करत असताना तो महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग किनाऱ्या जवळून जात असतांना सर्व काही व्यवस्थित असतांनाच अचानक एक समुद्री वादळ सुरु झाले. समुद्री वादळ इतके मोठे होते की काहीच दिसेनासे झाले.

पाहता पाहता त्या अरबी व्यापाऱ्याचे जहाज आपल्या निर्धारित मार्गावरून भलतीकडेच भरकटले. त्या भरकटलेल्या जहाजाला किनारी लावण्यासाठी कुठे किनारा दिसतो का हे तो व्यापारी शोधत होता. परंतु समुद्री वादळाच्या प्रखरते मुळे हे शक्य नव्हते. तितक्यात त्याला दूरवर एक लुकलुकणारा दिवा दिसला. त्या लुकलुकत्या दिवाच्या प्रकाशाकडे त्या व्यापाऱ्याने आपले जहाज मोठ्या प्रयत्नाने वळविले.

मोठ्या प्रयत्नाने त्या दिव्याच्या प्रकाशाकडे नेले असता त्याला शेवटी किनारा सापडला. जवळ जावून बघितले तेव्हा त्याला कळाले की सोसाट्याच्या वाऱ्यात ही न विझनारा तो लुकलुकणारा दिवा म्हणजे कुणकेश्वर शंकराच्या छोट्याश्या मंदिरातील एक पणती होती. आपल्याला या संकटातून वाचवल्यामुळे कृतज्ञेपोटी त्या अरबी व्यापाऱ्याने या ठिकाणीं मंदिराची उभारणी केली.

Shree Dev Kunkeshwar Temple हे एक शिव मंदिर असून छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. कुणकेश्वरला दक्षिण कोकणाची काशी म्हटले जाते.

Kunkeshwar Famous for

कुणकेश्वर हे गाव महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगळ तालुक्यात वसलेले आहे. शिव मंदिरा सोबतच खालील गोष्टींसाठी कुणकेश्वर गाव प्रसिद्ध आहे.

  1. श्री कुणकेश्वर शिव मंदिर (Kunkeshwar Temple)
  2. अल्फान्सो आंब्यासाठी कुणकेश्वर गाव प्रसिद्ध आहे. (Alphanso Mango)
  3. कुणकेश्वर समुद्र किनारा (Kunkeshwar Beach)
  4. कुणकेश्वर प्राचिन गुहा (Kunkeshwar Ancient Cave)
  5. कुणकेश्वर यात्रा (Kunkeshwar Festival)

ज्याप्रमाणे कुणकेश्वर गाव हे आपल्या शिव मंदिरासाठी प्रसिध्द आहे तसेच हे गाव आपल्या हापूस आंबा, स्वच्छ आणि नितळ समुद्र किनारा, आणि आपल्या शिव मंदिराच्या यात्रेसाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. श्री कुणकेश्वर मंदिर शिव भक्तांसाठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे त्याच प्रमाणे Shree Mahakaleshwar Mandir सुद्धा भक्तांना आपल्या कडे आकर्षित करत असते. तुम्ही जर श्री दत्तात्रय महाराज यांचे भक्त असाल तर Devgad Dutta Mandir Devasthan लां एकदा तरी नक्की भेट द्या. देवगड मंदिरातील स्वच्छ्ता आणि भव्य मंदिर तुम्हाला नक्की भुरळ पाडेल.

Shree Dev Kunkeshwar Temple | श्रीदेव कुणकेश्वर शिव मंदिर

Kunkeshwar Mandir हे देवगड तालुक्यातील कुणकेश्वर या गावी आहे. या मंदिराची उभारणी फार सुंदर व आकर्षक असून दक्षिण भारतीय शैलीची आहे. हे एक प्राचीन मंदिर असून समुद्र किनारा आणि पांढरी वाळू ह्या मंदिराच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतात.

मंदिराचा अनेक वेळा पुनरुज्जीवन करणारे छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात सतत येत असत.

Kunkeshwar Beach | कुणकेश्वर समुद्र किनारा

कोकणातील सौंदर्य संपूर्ण भारतालाच नाही तर विश्वाला भुरळ पाळत असते. खास करून कोकणातील समुद्र किनार पट्टी ही पर्यटकांना आपल्याकडे खेचून आणते. त्यातीलच कुणकेश्वर समुद्र किनारा (Kunkeshwar Beach) हे ठिकाण सुद्धा पर्यटकांना भुरळ पाळतात. कुणकेश्वर समुद्र किनारा आणि देवगड समुद्र किनारा असे दोन समुद्र किनारे लाभले आहेत.

Tara Mumbai Beach

कुणकेश्वर गावापासून ०४ किलो मीटर लांब Tara Mumbai Beach आहे. पर्यटक या बीचवर सूर्योदय (Sunrise) आणि सूर्यास्त (Sunset), पांढरी शुभ्र वाळू आणि निळे पाणी बघण्यासाठी गर्दी करतात. त्यासोबतच या किनाऱ्यावर तेथील मच्छिमार आपल्याला मच्छिमार करतांना सुद्धा बघायला मिळतात.

तारा मुंबई बीचचे वैशिष्ट म्हणजे फॉस्फोरेसेन्स. या समुद्रकिनाऱ्याचे वैशिष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी समुद्र लाटा चमकतात. हे सुध्दा पर्यटकांना आकर्षित करते.

Devgad Beach

दोन लहान टेकड्यांमध्ये असलेला हा समुद्रकिनारा देवगड बसस्थानकावरून इतर ठिकाणांहून येणाऱ्या लोकांसाठी प्रवेशयोग्य आहे. या समुद्रकिनाऱ्यावर देवगड बंदर आहे.  अरबी समुद्रात जाणारी जहाजे पाहण्यासाठी आतमध्ये असलेल्या दीपगृहात Light House मध्ये जाता येते.

Best Time to Visit Kunkeshwar Mandir

तुम्ही वर्षातील कोणत्याही वेळी कुणकेश्वरला भेट देऊ शकता, परंतु महाशिवरात्रीच्या उत्सवादरम्यान या गावाला भेट देणे खास आहे कारण महाशिवरात्रीला श्री देव कुणकेश्वर शिव मंदिरात एक भव्य कार्यक्रम असतो आणि याच दरम्यान यात्रा सुद्धा असते.

Wheather in Kunkeshwar

कुणकेश्वरचे मुख्य हवामान म्हणजे पाऊस, कोकण पट्ट्यात जास्त पाऊस (सुमारे 2500 मिमी ते 4500 मिमी) पडतो त्यामुळे तिथले हवामान दमट आणि उष्ण आहे. पावसाळ्यात हवामान 30 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचते. उन्हाळा उष्ण आणि दमट असतो, आणि तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. Kunkeshwar मध्ये हिवाळी तापमान सुमारे 28 अंश सेल्सिअस), आणि
हवामान थंड आणि कोरडे राहते.

How to Reach Kunkeshwar Mandir

कुणकेश्वर हे गाव आपल्या प्रख्यात शिव मंदीर तसेच सुंदर समुद्र किनारपट्टी साठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो भाविक तसेच पर्यटक कुणकेश्वर गावाला देश विदेशातून भेट देतात. Kunkeshwar ह्या गावाला जाण्यासाठी आपल्याकडे तिन्ही म्हणजे रेल्वे, रोड आणि हवाई मार्ग उपलब्ध आहेत.

Kunkeshwar Madir Map

How to reach Kunkeshwar Mandir by Road

Maharashtra State Road Transportation Corporation (MSRTC) म्हणजेच आपली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुद्धा Kunkeshwar साठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे लक्झरी बस आणि प्रायव्हेट कारने कुणकेश्वर जवळील मोठ्या शहरातून जसे की, पुणे, बेळगांव, पणजी आणि मुंबई जावू शकतो.

Distance from various Cities
To Devgad by Road
Distance
Mumbai to Devgad490 KM
Pune to Devgad347 KM
Aurangabad to Devgad542 KM
Ratnagiri to Devgad109 KM
Solapur to Devgad383 KM
Nagpur to Devgad995 KM
Kolhapur to Devgad143 KM
Goa to Devgad209 KM
Kunkeshwar Mandir

Maharashtra State Road Transportation Corporation (MSRTC) बस सेवा सुद्धा देवगड ते कुणकेश्वर व कुणकेश्वर ते देवगड आपली निरंतर सेवा देत आहेत. खाली दिलेल्या तक्त्या नुसार आपण MSRTC च्या बसेसच्या फेऱ्या दिलेल्या आहेत.

Devgad to Kunkeshwar Bus Facility

TimeDevgad to Kunkeshwar Bus Facility
05.30Devgad-Kunkeshwar
07.00Devgad-Mithbav
08.00Devgad-Morve
08.40Devgad-Katvan
09.10Devgad-Kunkeshwar
11.00Devgad-Mithbav
12.30Devgad-Mithbav
14.00Devgad-Katvan
15.30Devgad-Kunkeshwar
16.05Devgad-Morve
17.30Devgad-Katvan
19.30Devgad-Katvan
15.45Sawantwadi To Kunkeshwar
How to reach Kunkeshwar Mandir by Road

Kunkeshwar to Devgad Bus Facility

TimeKunkeshwar to Devgad Bus Facility
06.00Katvan-Devgad
06.30Kunkeshwar-Devgad
08.30Mithbav-Devgad
09.40Katvan-Devgad
10.00Morve-Devgad
10.05Kunkeshwar-Devgad
12.40Mithbav-Devgad
14.00Mithbav-Devgad
15.20Katvan-Devgad
16.20Kunkeshwar-Devgad)
18.00Morve-Devgad
18.40Katvan-Devgad
19.00Kunkeshwar to Sawantwadi
Kunkeshwar to Devgad Bus Facility

How to Reach Kunkeshwar Mandir by Train

कुणकेश्वरसाठी डायरेक्ट रेल्वे सुविधा नाही आहे. Kunkeshwar ला जर आपण रेलवेद्वारे येणार असाल तर आपल्याला खालील रेल्वस्थानका पर्यंत यावं लागेल त्या नंतर त्या रेल्वस्थानकापासून आपल्याला कुणकेश्वर मंदिरा पर्यंत बस किंवा ऑटो सुविधा उपलब्ध आहेत.

  • Kunkeshwar पासून सर्वात जवळील रेल्वस्थानक आहे नांदगाव जे 45 K.M दूर आहे.
  • दुसरे जवळील रेल्वस्थानक आहे कणकवली जे 52 K.M दूर आहे.

How to Reach Kunkeshwar Mandir by Air

Shree Kunkeshwar दर्शनासाठी जर आपण हवाई मार्गने येण्याचा बेत करत असाल तर खालील माहिती आपल्याला निश्चित उपयोगी पडेल.

  • Nearest airports to Kunkeshwar Goa (Panaji).
  • Kunkeshwar Mandir चे दर्शन घेण्यासाठी हवाई मार्ग International Airport Chatrapati Shivaji at Mumbai हे सर्वात जवळील मोठे एअरपोर्ट आहे.

Shreedev Kunkeshwar Bhakta Niwas

श्रीदेव कुणकेश्वर मंदीर आणि आपल्या सुंदर समुदरकिनारे तसेच देवगड अल्फांसो आंब्यासाठी प्रसिद्ध असलेले कुणकेश्वर येथे भाविकांची व पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते. भाविकांना राहण्यासाठी मंदिर प्रशासनाने Kunkeshwar Bhakta Niwas बांधले आहेत. त्याच प्रमाणे श्री गजानन महाराज संस्थान शेगांवला कधी भेट देण्याच्या विचारात आहेत आणि तिथे संस्थानाच्या भक्त निवासात राहण्याची प्लॅनिंग करत असाल तर तिथेही असेच अल्प दरात भक्त निवास संस्थांना मार्फत उपलब्ध करुन दिले जातात. जर आपन दत्तात्रय भक्त असाल आणि नरसोबाची वाडी येथील मंदिरात दर्शनाला जाण्याच्या विचारात असाल तर नरसोबाच्या वाडीला सुद्धा भक्त निवास व्यवस्था आहे.

Kunkeshwar Bhakta Niwas Contact Number

कुणकेश्वर मंदिर शेजारी असलेले कुणकेश्वर भक्ती निवास यांचा दूरध्वनी: ०२३६४-२४८६७५० हा आहे. या भक्त निवासातील खोल्यांचा दर: ₹२५०–३०० पर्यंत आहे. कुणकेश्वर भक्त निवासात १८ खोल्या आहेत, त्यापैकी फक्त तीन खोल्या संलग्न संडास बाथरूम आहेत. कुणकेश्वर भक्त निवासात रेस्टॉरंट नाही, तरी आपण भक्त निवासाच्या आवाराबाहेरील रेस्टॉरंटमध्ये जेवण केले जाऊ शकते. महाशिवरात्री आणि इतर सुट्यांमध्ये गर्दी असते. या भक्त निवासात सिंगल बेड असलेला हॉल देखील आहे.

Kunkeshwar Bhakta Niwas Room Rent

Shreedev Kunkeshwar Mandir दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना राहण्यासाठी कमी दरात चांगली व्यवस्था व्हावी याकरिता मंदीर प्रशासनाने Bhakta Niwas बांधलेले आहे. या भक्त निवास मधील खोल्यांचे दर खालील प्रमाणे आहेत.

Room DetailsRoom Rent
Comman RoomRs 500/-
Attached RoomRs 700/-
HallRs 3500/-
Rent for Cattering SpaceRs 500/-
Religious Rituals SpaceRs 500/-
Bathroom Facilities
(Per Person)
Rs 50/-
Kunkeshwar Bhakta Niwas Room Rent

Rules and Regulations for Bhakta Niwas Booking at Kunkeshwar Mandir Maharashtra

श्रीदेव कुणकेश्वर मंदिर प्रशासनाने Bhakta Niwas मधील खोली बुक करतांना काही नियम व अटी लावण्यात आले आहे. सर्व भाविकांनी या नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित आहे.

  1. बुकिंग करताना व खोली ताब्यात घेण्यापूर्वी संबंधीत सर्वभाडेकरु / प्रवाशांचे नांव, पत्ता, फोन नंबर नोंद करणेआवश्यक असून ओळखपत्र (इलेक्शन कार्ड/पॅन कार्ड)असणे बंधनकारक आहे व त्याची सत्यप्रत बुकिंग / खोलीताब्यात घेतेवेळी जमा करावी व भाडेपावती करावी.
  2. एका खोलीमध्ये कमाल 2 व्यक्तींनाच रहाण्यास परवानगीआहे.
  3. चेक आऊट टाईम सकाळी ९.०० वाजता होईल.
  4. प्रवाशी / भाडेकरु यांनी खोली ताब्यात घेतल्यावर सदरहू खोलीची चावी स्वतः ताब्यात ठेवावी, मात्र चावी गहाळझाल्यास ₹५००/- चार्ज आकारला जाईल.
  5. भाडेकरु / प्रवाशी यांनी आपल्या मौल्यवान वस्तुंची(दागिने, बॅगा, रक्कम इत्यादी) काळजी स्वतः घ्यावी,तक्रार स्विकारली जाणार नाही.
  6. भाडेकरु / प्रवाशी यांनी समुद्रस्नान करून आल्यास वाळूस्वच्छ करुनच भक्तनिवासमध्ये प्रवेश करावा.
  7. धुम्रपान, मद्यपान, शांतता न राखणे अगर गैरवर्तणूकीससक्त मनाई आहे, आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल.
  8. भक्तनिवासमध्ये कर्मचारीवर्ग व भाडेकरु / प्रवाशी यांचेव्यतिरिक्त कोणासही वास्तव्यास रहाता येणार नाही.रात्रौ ११.०० वाजता गेट बंद केला जाईल.

Top 10 Hotels near Kunkeshwar Temple

कुणकेश्वर चे श्री देव शिव मंदिर आणि समुद्र किनारे बघण्यासाठी देश परदेशातून भाविक आणि पर्यटक येत असतात. जवळ जवळ संपूर्ण वर्षभर खास करून महाशिवरात्रीला येथे भाविकांची अफाट गर्दी असते. जर तुम्ही सुद्धा कुणकेश्वरला श्रीदेव कुणकेश्वर शिव मंदिराचे दर्शन घेण्याचा बेत आखत आहात तर Kunkheshwar Bhakta Niwas ला पहिले प्राधान्य द्या.

जर तुम्हाला तेथे राहण्यासाठी जागा मिळाली नाही तर खालील हॉटेल्स सुद्धा उपलब्ध आहेत.

Name of HotelsDistance From
Kunkheshwar Mandir
Athaang Beach Resort25.5 km
Hotel Chivala Beach31.2 km
Sagar Sparsh – The Sea Touch34.6 km
Sea View Tarkali Resort33.3 km
Neelam’s Countryside34.3 km
Hotel Sagar Kinara, Malvan31.9 km
MTDC Resort Tarkarli37.0 km
Sai Homestay31.4 km
Konark Residency Malvan31.6 km
Samant Heritage25.4 km
Hotels near Kunkeshwar Mandir

MTDC Kunkeshwar Mandir

एमटीडीसी कुणकेश्वर हे देवगडजवळील समुद्रकिनारी असलेले रिसॉर्ट आहे. कुणकेश्वरपासून १६ किमी अंतरावर देवगड ही मुख्य बाजारपेठ आहे. एमटीडीसी कुणकेश्वर हे कुणकेश्वर मंदिराजवळ समुद्रकिनारी असलेले बंगला हॉटेल आहे. संपूर्ण अरबी समुद्राचे दृश्य आणि कुणकेश्वर मंदिर सोबत मिळणे खूप आनंददायी आहे.

Address and Contact Number of MTDC Kunkeshwar

कुणकेश्वर MTDC च्या रिसॉर्ट चा पत्ता पुढील प्रमाणे आहे. MH SH4, Kunkeshwar, Maharashtra 416612.

Contact number for Kunkeshwar MTDC resort 24 Hrs Booking Available – Moblie-9892112411 / Email –mtdc.in2009@yahoo.in

MTDC Kunkeshwar Accomodations

MTDC Kunkeshwar मध्ये डिलक्स रूम एसी, स्टँडर्ड रूम (नॉन एसी), आणि डिलक्स एसी रूम आहे ज्यामध्ये बाथटब आणि टीव्ही एथनिक शैलीतील घरगुती जेवण दिले जाते आणि ग्राहकांच्या आवडीनुसार सर्व्ह केले जाते. कोकण बीच टूर, तारकर्ली – आंबोली आणि गणपतीपुळे सारख्या महाराष्ट्र टूरची व्यवस्था एमटीडीसी कुणकेश्वर येथून करता येते.

MTDC Kunkeshwar Resort Facilities

कुणकेश्वर MTDC रिसॉर्ट मध्ये खालील प्रकारच्या सुविधा आपल्याला मिळतात. MTDC Kunkeshwar रिसॉर्ट सुविधा आरामदायी मुक्कामासाठी भरपूर सुविधा देतात,

  • वाहन पार्किंग,
  • लहान मुलांसाठी खेळण्याची जागा,
  • एक सुंदर बाग
  • एक ऑन-प्रॉपर्टी रेस्टॉरंट यांचा समावेश आहे.

Room Rent of MTDC Kunkeshwar Resort

Room TypePaxRent
Patil Wada 2 guests + 1 extra guest *spare mattress provided King size bed₹ 2,300 / night
Village Room2 guests + 2 extra guest *spare mattress provided King size bed ₹ 2,500 / night 
Hut Room 2 guests + 1 extra guest *spare mattress provided King size bed₹ 2,700 / night 
Deluxe Room 2 guests + 2 extra guest *spare mattress provided King size bed ₹ 3,200 / night
Premier Room 2 guests + 2 extra guest *spare mattress provided King size bed ₹ 3,400 / night 
Premier Room 2 guests + 2 extra guest *spare mattress provided King size bed ₹ 3,600 / night 
Group HallAccommodates 10 guests (The tariff says 12 but the other 2 are not functional) Standard single bed ₹ 9,700/ day
Room Rent of MTDC Kunkeshwar Resort

FAQ

best time to visit kunkeshwar

तुम्ही वर्षातील कोणत्याही वेळी कुणकेश्वरला भेट देऊ शकता, परंतु महाशिवरात्रीच्या उत्सवादरम्यान या गावाला भेट देणे खास आहे कारण महाशिवरात्रीला श्री देव कुणकेश्वर शिव मंदिरात एक भव्य कार्यक्रम असतो आणि याच दरम्यान यात्रा सुद्धा असते.

What is Kunkeshwar temple famous for?

कुणकेश्वर मंदिर हे प्रमुख शिव मंदिरांपैकी मानले जाते. कुणकेश्वर मंदिर महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर या गावात आहे.

Which station is near to Kunkeshwar?

Kunkeshwar पासून सर्वात जवळील रेल्वस्थानक आहे नांदगाव जे 45 K.M दूर आहे.

4 thoughts on “Great Shree Dev Kunkeshwar Mandir Bhakta Niwas 2024”

Leave a comment